ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या : नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:20 PM2021-05-20T13:20:39+5:302021-05-20T13:28:46+5:30

Tauktae Cyclone : जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मलिक यांची मागणी. तोत्के चक्रीवादळात दरम्यान अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचा झाला होता मृत्यू.

File a case of culpable homicide against ONGC Punish the guilty Nawab Malik tauktae cyclone | ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या : नवाब मलिक 

ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या : नवाब मलिक 

googlenewsNext
ठळक मुद्देतोत्के चक्रीवादळात दरम्यान अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचा झाला होता मृत्यू.जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मलिक यांची मागणी

"तोक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी (ONGC) विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

"तोक्ते चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडून ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही काही कामगार बेपत्ता झालेले आहेत. अक्षरशः शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व घटनेला ओएनजीसी जबाबदार आहे," असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 



"दरम्यान, बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर रात्री धर्मेद्र प्रधान चौकशी समिती नेमत आहेत. या चौकशी समितीने काही होणार नाही. जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे," अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Web Title: File a case of culpable homicide against ONGC Punish the guilty Nawab Malik tauktae cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.