शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील फरकंड्यात ग्रामपंचायत वादातून हाणामारी, ६० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 04:30 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले.

पालम (जि. परभणी) : तालुक्यातील फरकंडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्याद देण्यास गावातील कोणीही पुढे न आल्याने सरकारी फिर्यादीवरून दोन गटांतील ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. ऐनवेळी वीज गेल्याने लाठ्याकाठ्यानी एकमेकांशी तुंबळ हाणामारी सुरू करण्यात आली. यात दोन्ही गटांतील ८ जण जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीस गावात बंदोबस्तासाठी दाखल झाले. परिस्थिती आटोक्यात आली असून, गावातून कोणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बाबुराव आगळे यांच्या फिर्यादीवरून विजयी गटातील ४५, तर पराभूत गटातील २० अशा६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात कबीरवाडी, हिरानगरमध्ये राडा --    नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरही अनेक गावांमध्ये राडेबाजी सुरूच आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कबीरवाडी आणि मुक्रमाबाद हद्दीत हिरानगर तांडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मारहाणीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. अनेकांची यात डोकी फुटली तर दोन्ही गटातील शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले.-    सोमवारी मतमोजणी झाल्यानंतरही काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. मौजे कबीरवाडी येथे बालाजी सोपान सलगरे यांनी तक्रार दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत मदत का केली नाही म्हणून विराेधी गटाच्या सदस्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणात मरखेल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथे सुनीता विजय राठोड या महिलेला कुणाला मतदान केले असे म्हणून दगडाने मारहाण करण्यात आली तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस