मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:24 AM2024-04-21T08:24:40+5:302024-04-21T08:25:32+5:30

Bud Burn On Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज रात्री एक मोठी दुर्घटना घडली. एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दुर्घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

Fierce fire in bus on Mumbai-Pune expressway, bus burnt down, luckily no casualties | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज रात्री एक मोठी दुर्घटना घडली. एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दुर्घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमधून सुमारे ४२ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही बस मुंबईहून सोलापूरकडे वऱ्हाड घेऊन निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ आली असताना या बसला आग लागली. आग भडकल्याचे दिसताच प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी आरडाओरडा करत मदतीसाठी याचना सुरू केली. दरम्यान, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्था यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे बसला आग लागल्यानंतर तातडीने मदत पोहोचली नसती तर या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असती. दरम्यान, समोर येत असलेल्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: Fierce fire in bus on Mumbai-Pune expressway, bus burnt down, luckily no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.