शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर ठरणार पक्षिप्रेमींसाठी पर्वणी

By admin | Updated: January 30, 2015 04:01 IST

शहापूर तालुक्यात ‘वाइल्ड लाइफ’ या बोरिवलीच्या संस्थेने केलेल्या पक्ष्यांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी आढळले आहेत

जनार्दन भेरे, भातसानगरशहापूर तालुक्यात ‘वाइल्ड लाइफ’ या बोरिवलीच्या संस्थेने केलेल्या पक्ष्यांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी आढळले आहेत. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने शहापुरातील अभयारण्ये गजबजली आहेत. तानसा जलाशय व क्वॉरीपाडा जलाशयाच्या परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘वाइल्ड लाइफ’ संस्थेचे राजदेव सिंग, सुशांत मोरे, प्रवीण चव्हाण व खर्डी वनक्षेत्र कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला. यात तानसा जलाशयाच्या जंगलामध्ये ७३ प्रकारचे पक्षी आढळल्याचे सहायक वनसंरक्षक एस. शेख यांनी सांगितले.या सर्वेक्षणात पाणकावळे ६०, खंड्या १०, तुतारी ४, पिवळा परीट १, पिवळा धोबी ६, सोनधोबी ५, पांढरा धोबी २, करडा धोबी ४, गायबगळे ५०, मीडियन इग्रेट ३, बगळे १०, मोठे बगळे ५, राखी बगळा १, वंचक २०, ब्राडन क्राऊड २, करकोचा २०, शराटी ७, बदक ३, नॉर्थन पेंटल ४०, बदक ४०, गॅडवेल २०, युरेशिअन विगन ३०, थापट्या ५०, काणूक ४, पाणकोंबडी २, वारकरी २५, सोनेरी रंगाची कमळपक्षी ८, छोटे पाणबदक ३०, शेकाट्या १, टिटवी ३, कंढेरी चिखल्या १, जांभळी पाणकोंबडी २, पाणकोंबडा १, हिरवा तुतवार २, हिरवा सुरमा २, ढिपकेवाला तुतवार २, रिव्हर टर्न ८, तास ५, धीवर २, तालवारी पाकोळी ५००, कॉमन शॉलवो ५०, पांगळी १००, उघडचोच करकोचा २४०, रुमॉल प्रेटिन कोल ५, कमी आवाजाचे बदक २० ते २५, लिटील ग्रॅबी १५० ते १६०, पाणकावळे ६० ते ७०, छोटे पाणकावळे ३०-४०, रिव्हरस्रे ८, ग्रे हेरन १२, वारकरी पाणरिलवा १, लालसरी ३००, वक्रांग १ यासह मरागा राखी रामगंगारा, कोतवाल, हिवाळी, सुरय, सुतार आदी पक्षी आढळले. त्यामुळे हा परिसर पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे़