वाशिममध्ये शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: December 19, 2014 01:24 IST2014-12-19T01:24:58+5:302014-12-19T01:24:58+5:30

नापिकीमळे कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत मंगरूळपीर तालुक्यातील शेतक-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

Farmer's suicide in Washim | वाशिममध्ये शेतक-याची आत्महत्या

वाशिममध्ये शेतक-याची आत्महत्या

मंगरुळपीर (वाशिम) : नापिकीमळे कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत सापडलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलु येथील ङ्म्रीकृष्ण देवसा गुजर (६0) या शेतकर्‍याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
माळशेलु येथील ङ्म्रीकृष्ण गुजर यांच्याकडे ५ एकर शेती आहे. नापिकीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५५ हजार रुपयांच्या पीककर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत ते होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmer's suicide in Washim