परतीच्या पावसात भिजलं पिक, दिवाळी साजरी कशी होणार या चिंतेत शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 05:35 PM2017-10-15T17:35:09+5:302017-10-15T17:35:25+5:30

दिवाळी तोंडावर आली असताना नुकत्याच आलेल्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचणेत

Farmer's suicide in the matter of worry about how to celebrate Diwali celebrations, after the fall in rainy season | परतीच्या पावसात भिजलं पिक, दिवाळी साजरी कशी होणार या चिंतेत शेतक-याची आत्महत्या 

परतीच्या पावसात भिजलं पिक, दिवाळी साजरी कशी होणार या चिंतेत शेतक-याची आत्महत्या 

Next

तिवसा (अमरावती) : दिवाळी तोंडावर आली असताना नुकत्याच आलेल्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचणेत तिवसा तालुक्यातील जावरा फत्तेपूर येथील एका शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

अतुल ऊर्फ पिंटू साहेबराव रामपुरे (२६) असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अतुलने एका एकरात सोयाबीन पेरले होते. सोयाबीन भिजल्याने खर्च कसा निघणार याची चिंता त्याला वाटू लागली होती. यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

तिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाला सुपूर्द केला. त्याच्या पार्थिवावर जावरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर एका तरुणाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Farmer's suicide in the matter of worry about how to celebrate Diwali celebrations, after the fall in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.