शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी नंबर प्लेटच्या दंडात सुधारणा आवश्यक

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवर सध्या केवळ १०० रुपये दंड आकारल्या जातो. यामुळे वाहनचालकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होत नाही. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू अशी

हायकोर्टाचे निरीक्षण : गृहसचिवांना प्रतिवादी करण्याचे निर्देशनागपूर : वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवर सध्या केवळ १०० रुपये दंड आकारल्या जातो. यामुळे वाहनचालकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होत नाही. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू अशी महागडी वाहने चालविणाऱ्यांसाठी हा दंड अगदीच किरकोळ आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दंडात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना सरकारी वकिलाला केली. याशिवाय याचिकाकर्त्याला याप्रकरणात गृह विभागाचे सचिवांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिलेत. वाहनांच्या क्रमांकाला भाई, आई, काका, मामा असे आकार देऊन कायदा पायदळी तुडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सत्पालसिंग रसपालसिंग रेणू यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या वतीने वाहतूक पोलीस उपायुक्त भारत तांगडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पोलिसांनी १ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत फॅन्सी नंबर प्लेटच्या ५९ हजार ३८१ वाहनांवर कारवाई करून ६३ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार परिवहन विभागाने जानेवारी ते एप्रिल या कालावधीत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या ५५ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. या दोन्ही प्रतिज्ञापत्रांवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. याचिकाकर्ते सत्पालसिंग रेणू यांनी स्वत:च बाजू मांडली. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्याची तक्रारमोटार वाहन कायदा-१९८८ व मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध असतानाही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. केंद्र शासनाने २८ मार्च २००१ रोजी अधिसूचना काढून हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट्सचा नियम लागू केला आहे. या नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०११ रोजी सर्व राज्यांना नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आजही नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग इत्यादीसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही. अनेकजण हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत क्रमांक लिहितात. नंबर प्लेटवर लोगो किंवा चित्र चिपकविलेले असते अशी याचिकाकर्त्याची तक्रार आहे.