शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट डिग्री प्रकरण पोलिसांत

By admin | Updated: June 22, 2014 00:37 IST

अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट ) तयार करून सिंगापूरसह इतरही परदेशी कंपन्यामध्ये नोकरीसाठी वापरले असल्याचे निदर्शनास आले आहे

पुणो : पुणो विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट ) तयार करून सिंगापूरसह इतरही परदेशी कंपन्यामध्ये नोकरीसाठी वापरले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे शेकडो बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करणा:या व  त्यांचा वापर करणा:यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी लेखी तक्रार विद्यापीठातर्फे पोलिसांकडे देण्यात आली आहे.
पुणो विद्यापीठाला’द रिपब्लिक ऑफ सिंगापूर’ यांच्याकडून  गुणपत्रके,पदवी,पदविका तसेच बोनाफाईड सर्टिफिकेटस् पडतळणीसाठी प्राप्त झाली होती. या प्रमाणपत्रवर विद्यापीठाच्या काही माजी कुलगुरूंच्या बनावट सह्या व शिक्के असल्याचे दिसून आले. ही बनावट प्रमाणपत्रे परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सादर करण्यात आली होती.परंतु,विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने यासंदर्भातील अभ्यासकरून विद्यापीठाकडे याबाबतचा अहवाल सादर करून  याचा  तपास पोलिसांकडून करून घेण्याची शिफारस केली होती. 
सिंगापूर शासनाकडून पाठविण्यात 79 विद्याथ्र्याचे बोनाफाईट सर्टिफिकेटस्ची तपासणी केल्यानंतर सदर प्रमाणपत्रवर विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचा जावक क्रमांक व अधिका:यांची सही बनावट असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले.तसेच 21 विद्याथ्र्याची गुणपत्रके,पासिंग सर्टिफिकेटस् व पदवी प्रमाणपत्रंची तपासणी केली असता ही प्रमाणपत्रे देखील बनावट असल्याचे अढळून आले. 
इराण येथील नझीपूर मक्सूद इंसार या विद्याथ्र्याचे कागदपत्रके बनावट असल्याचे  कॉन्स्युलेट जनरल ऑफ दी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.तसेच जाधवर समितीने विविध कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या 13 विद्याथ्र्याची प्रकरणो तपासली असता  सदर विद्याथ्र्याची प्रमाणपत्रे सुध्दा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
पोलीस अधिका-यांच्या मर्यादांचा विचार करता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून घेणो उचित ठरणार आहे. सिंगापूर व इराणसह इतरही देशांमध्ये अनेक विद्यार्थी बनावट  डीग्री  प्रमाणपत्रंवर नोकरी करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणो आवश्यक आहे.
- सुधाकर जाधवर, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा, पुणो विद्यापीठ 
डॉ. सुधाकर जाधवर समितीने सादर केलेला अहवाल व  बीओईमधील चर्चेनुसार या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी,अशी लेखी तक्रार केली आली .
- नरेंद्र कडू, कुलसचिव, पुणो विद्यापीठ