उद्घोषणेद्वारे बिघाडांची माहिती

By Admin | Updated: October 2, 2015 04:09 IST2015-10-02T04:09:43+5:302015-10-02T04:09:43+5:30

एखाद्या तांत्रिक बिघाडाने लोकलचा खोळंबा उडाल्यास त्याची माहिती लोकलमधील प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे काही कारण समजू न शकल्याने प्रवाशांना पुढील

Failure information by announcing | उद्घोषणेद्वारे बिघाडांची माहिती

उद्घोषणेद्वारे बिघाडांची माहिती

मुंबई : एखाद्या तांत्रिक बिघाडाने लोकलचा खोळंबा उडाल्यास त्याची माहिती लोकलमधील प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे काही कारण समजू न शकल्याने प्रवाशांना पुढील प्रवासात अडथळा निर्माण होतो. हे पाहता लोकलमध्ये उद्घोषणेद्वारे तांत्रिक बिघाडाची माहिती देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेवरील ५८ सिमेन्स लोकलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ओव्हरहेड वायर, सिग्नल, लोकलमधील बिघाडाबरोबरच रुळाला तडा जाण्याच्या घटना घडतात. मध्य रेल्वेमार्गाच्या मेन लाइनवर तर गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाडांनी परिसीमाच गाठली आहे. तांत्रिक बिघाड नेमका कुठे झाला, कारण काय, तांत्रिक बिघाड कधी दुरुस्त होणार याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवाशांना पुढील प्रवासात अडथळा निर्माण होतो. हे पाहता लोकलमधील उद्घोषणेद्वारे प्रवाशांना त्याची माहिती देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला. त्यासंदर्भातील काम पूर्ण केल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Failure information by announcing