शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-गडकरींपुढे विश्वस्त निवडीचा पेच

By admin | Updated: January 14, 2015 00:46 IST

नासुप्रच्या विश्वस्तपदी कोणत्या ‘विश्वासू’ची नियुक्ती करायची असा पेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर

‘एनएमआरडीए’ स्थापनेच्या प्रक्रियेमुळे विलंबाची शक्यता नागपूर : नासुप्रच्या विश्वस्तपदी कोणत्या ‘विश्वासू’ची नियुक्ती करायची असा पेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर निर्माण होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदासाठी सहा महिने रस्सीखेच सुरू राहिली. त्यामुळे आता विश्वस्तपदी नियुक्ती करताना नेत्यांना जपून पावले टाकावी लागणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक सदस्य गडकरींच्या पसंतीने तर दुसरा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पसंतीने नियुक्त होईल. तर, आमदारांमधून होणारी नियुक्ती संयुक्त संमतीने होईल, असे मानले जात आहे. मात्र, असे असले तरी नासुप्रचे एनएमआरडीएमध्ये रूपांतर करण्याची सुरू असलेली प्रक्रिया पाहता विश्वस्तांची निवड होण्यासाठी आणखी चार- ते सहा महिने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनातर्फे नासुप्रवर तीन सदस्यांची नियुक्ती केली जायची. यातील एक आमदारांमधून व उर्वरित दोन सदस्यांसाठी निवडीचे बंधन नव्हते. आघाडी सरकारमध्ये आमदारांमधून दीनानाथ पडोळे यांना ती संधी मिळाली होती. आ. सुधाकर कोहळे यापूर्वी नासुप्रचे विश्वस्तपद भूषविले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष असलेले आ. कृष्णा खोपडे हे स्वत:च या पदासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे आ. सुधाकरराव देशमुख किंवा आ. डॉ. मिलिंद माने यांच्यापैकी एकाला ही संधी मिळू शकते. उर्वरित दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने आपसात वाटून घेतल्या होत्या. काँग्रेस नेते अनंतराव घारड व राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते आणि सध्या शिवसेनावासी झालेले किशोर कन्हेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. त्यामुळे आघाडी सरकारने लागू केलेला फार्म्युला युती सरकारनेही लागू केला तर विश्वस्ताचे एक पद शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे विश्वस्तांची दोन्ही पदे स्वत:कडे ठेवून शिवसेनेला दुसरीकडे ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे नगरसेवक मुन्ना यादव हे विश्वस्त पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. महापालिकेत सत्तापक्षनेते पदासाठी बरीच रस्सीखेच झाली. सहा महिने ओढाताण सुरू राहिली. शेवटी स्पर्धेत नसलेले पण अनुभवी असलेले दयाशंकर तिवारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. या पदासाठी इच्छुक असलेले गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल आदींचा हिरमोड झाला. त्यामुळे आता विश्वस्त पदासाठी गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल यांची नावे आघाडीवर आहेत. नगरसेवक भूषण शिंगणे, रमेश शिंगारे यांचेही नाव स्पर्धेत आहे. (प्रतिनिधी)फक्त नगरसेवकांनाच एन्ट्री आजवर महापालिकेत नगरसेवक नसलेल्या व्यक्तीचीही विश्वस्तपदी निवड केली जात होती. पण आता मात्र फक्त नगरसेवकांनाच ही संधी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार महापालिकेच्या हद्दीत येणारा भाग वगळून मेट्रोरिजनअंतर्गत येणाऱ्या भागाची जदबाबदारी नासुप्रकडे सोपविली जाणार आहे. हे करताना एमएमआरडीएच्या धर्तीवर एनएमआरडीएची स्थापना केली जाणार आहे. एमएमआरडीएमध्ये विश्वस्तपदी फक्त लोकनियुक्त नगरसेवकांनाच विश्वस्तपदी संधी देण्याची तरतूद आहे. हीच तरतूद एनएमआरडीएला देखील लागू राहील. याचा फायदा नगरेवकांना होणार असून पक्षासाठी झटणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मात्र नासुप्रची दारे बंद होणार आहेत.