शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंग

By admin | Updated: December 28, 2014 01:07 IST

मुंबई पाहण्यासाठी आईबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे.

नवी मुंबई : मुंबई पाहण्यासाठी आईबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. या मुलीची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिची आई मुंबईत नोकरीच्या शोधात होती. त्याचाच फायदा या सुरक्षारक्षकांनी घेतला.मुळची सोलापूरची असलेली ही मुलगी आईसोबत मुंबई पाहण्यासाठी आली होती. ती पनवेल येथे मावशीच्या घरी राहत होती. तिची आई तात्पुरत्या नोकरीच्या शोधात होती. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर तिला पनवेलमधील सदाशिव सोसायटीत एका कुटुंबाला घरकाम करणारी महिला पाहिजे असल्याचे समजले. परंतु हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या परत येण्याबाबतची विचारपूस तिच्या आईने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडे केली. २२ डिसेंबरला ही महिला आपल्या ५ वर्षीय मुलीला सोबत घेऊन पुन्हा तिथे गेली. यावेळी सोसायटीचे सुरक्षा रक्षक शिवमंडी पांडे (२५) व श्रीकांत पांडे (३५) तिथे होते. या दोघांनी चौकशीच्या बहाण्याने महिलेला इमारतीतील एका मोकळ्या खोलीमध्ये नेले. त्यावेळी तिची मुलगी इमारतीच्या आवारातच खेळत होती. शिवमंडी पांडे महिलेची विचारपूस करत असताना श्रीकांत बाहेर गेला होता. काही वेळाने तो परत आल्यानंतर शिवमंडी बाहेर गेला. त्यानंतर ती महिला मुलीला घेऊन घरी गेली.महिला त्या खोलीत असताना दोन्ही सुरक्षारक्षकांनी तिच्या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला होता. परंतु भीतीमुळे मुलीने याची वाच्यता आईकडे केली नव्हती. मात्र दोन दिवसांनी या मुलीची प्रकृती बिघडली. अखेर २५ डिसेंबरला तिने या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानुसार मुलीच्या आईने पनवेल शहर पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार शिवमंडी पांडे व श्रीकांत पांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर ३७६, ५०६ व ३२३ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)