देशाची तिजोरी भरणाऱ्या महाराष्ट्रात महाभयंकर गरिबी, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:17 AM2022-11-16T09:17:29+5:302022-11-16T09:21:17+5:30

Poverty In Maharashtra : निती आयोगाने जाहीर केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकात देशाला सर्वाधिक जीएसटीचे उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राचे भयावह चित्र समोर आले आहे.

Extreme poverty in Maharashtra, which fills the country's exchequer, the number of poor families below the poverty line | देशाची तिजोरी भरणाऱ्या महाराष्ट्रात महाभयंकर गरिबी, धक्कादायक आकडेवारी आली समोर

देशाची तिजोरी भरणाऱ्या महाराष्ट्रात महाभयंकर गरिबी, धक्कादायक आकडेवारी आली समोर

googlenewsNext

- नारायण जाधव
नवी मुंबई : निती आयोगाने जाहीर केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकात देशाला सर्वाधिक जीएसटीचे उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राचे भयावह चित्र समोर आले आहे. यात ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबी १४.९% इतकी आहे. तर केरळमधील गरिबी ०.७१%  आहे. 
म्हणजेच राज्याची गरिबी केरळपेक्षा २१ पट अधिक आहे. राज्यात ३६ लाख ११ हजार २५८ कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जगत असून त्यांची लोकसंख्या एक कोटी ४४ लाख ४५ हजार  ३२ इतकी आहे.  मनरेगातून कामाचे दिवस वाढवून गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


गरीब कुटुंबांची एकूण संख्या
३६,११,२५८
राज्याची गरिबी केरळच्या २१ पट अधिक, समद्धी वाढविण्यासाठी मनरेगाचा आधार

Web Title: Extreme poverty in Maharashtra, which fills the country's exchequer, the number of poor families below the poverty line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.