शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 13, 2015 09:42 IST

नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात. सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ -  राजकारणात प्रवेश करताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. पण सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण असून राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखात भाजपावर  टीका केली. नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात, आता केजरीवाल स्वतःचे काय बारसे करुन घेतात हे बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणात येताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण 'सेवक' असतो पण त्यानंतर तो सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे. त्यामुळे केजरीवाल दिल्लीत काय काम करतात याकडे लक्ष लागले आहे असा चिमटाही त्यांनी काढला.

ओबामा दिल्लीत आले तेव्हा नरेंद्र मोदींनी ३० - ३५ लाख रुपयांचा कोट घातल्याची चर्चा होती. आता अरविंद केजरीवाल यांचा मफलरही ब्रँडेड होऊ नये असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे साध्या राहणीमानासाठी कौतुक केले आहे.  समाज अनुकरणवादी असून प्रत्येक 'हिरो'ने जपून पाऊल टाकावे, सेवक तर सर्वच जण असून सेवकपणाचा अतिरेक करु नका.  जनता हीच जनार्दन असून जनता पाठिशी आहे या अहंकारातून सर्वांनीच बाहेर पडावे असा उपदेशाचा डोसही उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला पाजला आहे.