शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अखेर राज्यात अडीच कोटी सातबारे झाले डिजिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:39 PM

त्रुटी दूर करुन फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के काम 

ठळक मुद्देसध्या केवळ साडे सहा टक्के सातबारे उत्तारे डिजिटल स्वरुपात येणे शिल्लक तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणारे सातबारा संगणकीकरण दुरुस्ती अर्ज

पुणे : गेल्या पाच-सहा वर्षांपासून राज्यात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरु असून, अखेर ९३ टक्के सातबारे उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाले आहेत. आता राज्यातील २ कोटी ३४ लाख ५६ हजार सातबारे ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध झाले आहे. सध्या केवळ साडे सहा टक्के सातबारे उत्तारे डिजिटल स्वरुपात येणे शिल्लक आहे. या सातबाऱ्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करुन फेब्रुवारीअखेर पर्यंत शंभर टक्के काम सातबारे ऑनलाईन स्वरुपात येणार आहेत. राज्याचे अपर मुख्य महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सातबारा संगणकीकरण आणि डिजिटल सातबारा उपलब्धी संदर्भात आढावा घेतला. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम, सहआयुक्त लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, राज्य समन्वयक रामदास जगताप उपस्थित होते. सातबारा उतारा यांचे डिजिटलायझेशन झाल्यानंतर अद्यापही साडेसहा टक्के सातबारा उतारा मध्ये त्रुटी आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर आहे. त्रुटी दुरुस्तीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण कार्यवाही करावी अशा सूचना मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.राज्यात दोन कोटी ३४ लाख ६५ हजार सातबारा उतारे डिजिटल साईनयुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्याचा नागरिकांना फायदा होत आहे. सातबारा आणि त्याअनुषंगाने हक्क प्रणाली या सेवा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तसेच त्रुटी मुक्त सातबारा लोकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील महसूल प्रशासनाची आहे, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणारे सातबारा संगणकीकरण दुरुस्ती अर्ज यांचा वेळेत निपटारा करून तोटी दुरूस्ती केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनdigitalडिजिटलFarmerशेतकरीGovernmentसरकार