"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:08 IST2025-09-03T12:07:26+5:302025-09-03T12:08:09+5:30
"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..."

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत जीआर काढल्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले. यासंदर्भात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी, काल जरांगे पाटलांची इच्छा होती की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्यांनी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी व्यासपीठावर यावे, पण त्यावेळी ती मान्य झाली नाही, कारण प्रत्येक नेता वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले? असे एका पत्रकाराने विचारले असता, राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानितला हा अतिशय गंभीर प्रश्न होता. अशा वेळेला सर्वांनी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राहणे आवश्यक होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मुंबई संदर्भातील काही प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्र ठेवण्यासाठी, कधीही भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणे आवश्यक होते."
राऊत पुढे म्हणाले, "स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीत गुंतलेले होते. हे मला माहीत आहे. की, कशा प्रकारे यातून मर्ग काढायचा? हाय कोर्टाच्या निर्णयानंतर आपण कशा प्रकारची पावले टाकायला हवीत? किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलांकडे जायला हवे? यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. यासंदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांबद्दल अपशब्द वापरले, त्यांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे."
याच वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, "एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता? की हे प्रकरण आणखी चिघळत रहावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत यावेत, अशी काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षाने जानवले, असेही संजय राऊत म्हणाले.