"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:14 IST2025-07-07T11:12:00+5:302025-07-07T11:14:32+5:30
Hindi Controversy in Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्याने राजकारण ढवळून निघाले. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ललकारलं आहे.

"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
Raj Thackeray Hindi Controversy: "आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा", असा खोचक टोला लगावत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दुबेंनी दाऊद इब्राहिम सोबत तुलना करत एक सवाल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या मुद्द्याविरोधात राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद उमटले. यातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या. याच मुद्द्यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आपल्या घरात कुत्राही वाघ असतो म्हणत डिवचलं.
निशिकांत दुबेंनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना कोणते आव्हान दिले?
खासदार दुबे यांनी मराठीतून एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."
वाचा >>"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
खासदार निशिकांत दुबेंनी ही पोस्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही टॅग केली आहे.
"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."@RajThackeray@OfficeofUT@ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
दाऊद इब्राहिम आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय?
खासदार दुबेंनी म्हटले आहे की, "मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून कश्मिरी हिंदूंना हाकलून लावणाऱ्या सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर किंवा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्या काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केले, दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहेत", अशी टीका दुबे यांनी केली आहे.