शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अनेक धरणांत आढळल्या त्रुटी!

By admin | Updated: July 18, 2015 00:09 IST

राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली.

मुंबई : राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली. सरकारच्या धरणविषयक समितीने केलेल्या पाहणीत राज्यातील ४०० धरणांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हा मुद्दा आज सुभाष पाटील, धैर्यशील पाटील व जिवा पांडू गावित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. टेमघर आणि वरसगाव या धरणांची स्थिती अतिशय नाजूक असल्याने याबाबत तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर या धरणांची पाहणी आपण स्वत: करू, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. धरणांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आवश्यक आहे याचा अभ्यास करून तो वेगळा राखून ठेवण्याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.टेमघर धरण २०१०मध्ये बांधून पूर्ण झाले; मात्र त्यात खूप गळती असल्याचे दिसून आले आहे. याची तत्काळ दुरुस्ती करण्यास ठेकेदारास सांगण्यात आले होते. मात्र वारंवार नोटीस बजावूनही त्याने दखल घेतलेली नाही. म्हणून सरकारने स्वत:च्या निधीतून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत हे काम करण्यास भाग पाडण्यात येईल, असे गिरीश महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)धरणस्थिती अहवालात १२२६ धरणांपैकी यवतमाळमधील निगनूर, रायगडमधील आंबेघर व कुडकी या तीन धरणांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यापैकी कुडकी धरणाची दुरुस्ती झाली असून, निगनूर व आंबेघर धरणाची दुरुस्ती करायची असून, या धरणांना अद्याप धोका निर्माण झालेला नसल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली. शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी या वेळी धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवा, अशी मागणी केली.