शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क

By admin | Updated: December 29, 2014 05:07 IST

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुस-या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे

राकेश घानोडे, नागपूरपतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुस-या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सध्या हा नियम भारतीय रेल्वेतच असून, शासनाच्या इतर विभागांतही त्याचा अवलंब करावा, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.समाजात काय सुरू आहे हे आपण विसरू शकत नाही. अनेक पुरुष आधी लग्न झालेले असतानाही दुसऱ्या महिलेशी सलगी वाढवितात. सत्य माहिती दडवून तिच्याशी लग्न करतात. यात त्या महिलेची काहीच चूक नसते. देशात अशा प्रकरणांची संख्या फार मोठी आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.पक्षकार हिंदू असल्यास हिंदू विवाह कायद्यानुसार असे विवाह अवैध ठरतात. न्यायालये या कायद्याच्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही. पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्या पत्नीला सर्व लाभ देऊन दुसऱ्या पत्नीला उपासमार होण्यासाठी सोडून द्यावे काय, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर गांभीर्याने व महिला सशक्तीकरण चळवळीला लक्षात ठेवूनच द्यावे लागेल, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ अनुसार लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. अनुच्छेद ३९ (ए)मध्ये पुरुष व महिलांना समान पद्धतीने संरक्षण करणे, तर अनुच्छेद ३९ (ई) मध्ये महिलांना आरोग्य व शक्ती प्रदान करणे अपेक्षित आहे. रेल्वे कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील नियम ७५ मधील उपनियम ७ (आय)(ए) मध्ये पहिल्या व दुसऱ्या पत्नीमध्ये निवृत्तिवेतनाचे समान वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद राज्यघटनेचा उद्देश साध्य करणारी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्रीय प्रशासकीय लवादाने २८ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्याच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक निवृत्तिवेतन समान भागात विभागून देण्याचा आदेश दिला होता. याविरुद्ध रेल्वेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११ अनुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि तिच्यासोबत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या महिलेसोबत केलेला विवाह अवैध ठरतो, असे रेल्वेचे म्हणणे होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षणे नोंदवून रेल्वेची याचिका फेटाळून लावली.