शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त; राजू शेट्टींचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:48 PM

पुढील महिन्यात संघटनाअंतर्गत सगळ्या निवडणुका होतील.

ठळक मुद्देसोलापूर येथील सात रस्ता परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन सुरूयेत्या ११ जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार११ फेबु्रवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी गठीत करण्यात येणार

सोलापूर : महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त केल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सोलापूर येथील सात रस्ता परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.याबाबत माहिती देताना रविकांत तुपकर म्हणाले की, माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रदेश पातळीपासून सर्व पदे बरखास्त करण्यात आले आहेत. आगामी काळात संघटनेला राजकीय ताकद मिळावी व चळवळ गतीमान करावी यासाठी नव्या कार्यकारणीत तरूणांना जास्तीचे प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या ११ जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यानंतर ११ फेबु्रवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याचीही माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. यावेळी कार्यकारणी गठीत करण्यासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आल्याचेही तुपकर यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीFarmerशेतकरीRavikant Tupkarरविकांत तुपकर