शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारली

By admin | Updated: June 5, 2014 02:03 IST

इंग्रजी विषयाचे नाव घेताच राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना घाम फुटत होता. मात्र, या विषयाने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत चांगलीच साथ दिली आहे.

बारावीचा निकाल : इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.४० टक्केदिगांबर जवादे /गडचिरोली : इंग्रजी विषयाचे नाव घेताच राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना घाम फुटत होता. मात्र, या विषयाने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत चांगलीच साथ दिली आहे. राज्यात या विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ९३.४० टक्के आहे. तर नागपूर बोर्डाचा इंग्रजी विषयाचा निकाल ९१.७८ टक्के एवढा आहे. मागील अनेक वर्षातील उच्चांक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेचे महत्व लक्षात घेऊन हा विषय अगदी पहिल्या वर्गापासूनच सक्तीचा करण्यात आला आहे. इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून एक कटकट बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर या विषयाचे नाव घेताच घाम फुटतो. निकाल पाडणार्‍या या विषयाने यावर्षीच्या निकालात मात्र विद्यार्थ्यांना चांगलीच साथ दिली आहे. राज्यभरातून ११ लाख ९० हजार १२१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ११ लाख ११ हजार ५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर बोर्डाचा इंग्रजी विषयाचा निकाल ९१.७८ टक्के एवढा आहे. बोर्डनिहाय निकालबोर्डाचे नाव इंग्रजीचा निकालनागपूर ९१.७८पूणे ९३.८२औरंगाबाद ९३.९३मुंबई ९३.८५कोल्हापूर ९४.०६अमरावती ९३.७५नाशिक ९०.९२लातूर ९४.२९कोकण ९६.८५तोंडी परीक्षेने सावरला निकाल४मागील काही वर्षापासून इंग्रजी विषयासाठी तोंडी परीक्षा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेसाठी व २० गुण तोंडी परीक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. तोंडी परीक्षेचे गुण देण्याचा अधिकार महाविद्यालयाकडे देण्यात आला आहे. तोंडी परीक्षेचे गुण १५ ते २० या दरम्यान दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत २० पेक्षाही कमी गुणांची गरज भासते. विद्यार्थी एकाच विषयात नापास असेल तर १५ गुणापर्यंत ग्रेसही दिल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १० पेक्षा कमी गुण मिळाले तरी सदर विद्यार्थी उत्तीर्ण होतो. यामुळे मागील काही दिवसांपासून इंग्रजी विषयाच्या निकालाची टक्केवारी वाढत असल्याचे दिसून येते.