शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:27 AM

ED Notice To Amol Kirtikar: ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली असून, काही तासांतच ईडीने नोटीस बजावत झाडाझडतीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

ED Notice To Amol Kirtikar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी यादी जाहीर करण्यात येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पहिली १७ उमेवादारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतून चार जणांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या अवघ्या तासाभरात अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक अमोल कीर्तिकर यांच्या बंगल्यावर पोहोचले असून, झाडाझडती सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने अमोल कीर्तिकर यांच्या दापोलीतील बंगल्यावर धाड टाकली आहे. दापोली तालुक्यातील शिर्दे या गावात ईडीचे अधिकारी दाखल झाले. यानंतर या गावातील अमोल कीर्तिकर यांच्या बंगल्यावर जात झाडाझडती सुरू केली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

ईडीच्या कारवाईवरून विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येते. यातच ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याच्या काही तासांत अमोल कीर्तिकर यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीमुळे पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झाली आहे. अमोल कीर्तिकर यांना दिवसभरात हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे ईडीचा ससेमिरा मागे लागल्याने अलीकडेच काही नेत्यांनी पक्षांतराची भूमिका घेतली होती. 

दरम्यान, अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटात राहणे पसंत केले. अमोल कीर्तिकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे ठाकरे गटाने वायव्य मुंबई येथून अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर इच्छूक असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पिता-पुत्रांची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबईdapoli-acदापोलीRatnagiriरत्नागिरी