ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:40 PM2020-09-18T12:40:00+5:302020-09-18T12:40:31+5:30

राज्यात यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, विश्वजित कदम, शंकराराव गडाख यांच्यासह अन्य काहींना कोरोना लागण झाली होती.

Energy Minister and Nagpur Guardian Minister Dr. Nitin Raut infected with corona | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

Next

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. स्वत: ट्विट करत या मंत्र्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. यापूर्वीही राज्यातील ५ मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊन ते उपचारानंतर घरी परतले आहेत.

महाराष्ट्रातील उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विटरवर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

राज्यात यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, विश्वजित कदम, शंकराराव गडाख यांच्यासह अन्य काहींना कोरोना लागण झाली होती. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. याठिकाणी कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे त्यात ३ लाख एक्टिव रुग्ण आहेत तर ३० हजाराहून जास्त मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Read in English

Web Title: Energy Minister and Nagpur Guardian Minister Dr. Nitin Raut infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.