शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून चिमुकल्याचा अंत

By admin | Updated: December 28, 2014 01:31 IST

अंगणात खेळता खेळता जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने पाचवर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाला.

राहुरी (जि़ अहमदनगर) : अंगणात खेळता खेळता जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने पाचवर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाला. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. तब्बल सोळा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. डावखर मळा येथे अशोक खेमनर यांचे घर आहे. घरापासून जवळच नितीन डावखर व कुमार डावखर यांची विहीर आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास खेमनर यांचा मुलगा महेश (५) हा आईचा मोबाईल घेऊन अंगणात खेळत होता. परंतु खेळताखेळता तो विहिरीकडे कसा गेला कोणालाच समजले नाही. अचानक तोल गेल्याने अशोक विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी अशोक घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. दरम्यान, जवळच्याच मिरा गायकवाड व उषा गायकवाड यांनी तो विहीरीत पडताना पाहिले. त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीवरील सुमारे शंभर लोकांचा जमाव जमा झाला. पोटचा गोळा विहिरीत बुडाल्याचे ऐकून चिमुकल्याची आई मंदा हिची शुद्धच हरपली. स्थानिक तरूणांनी पटापट पाण्यात उड्या घेऊन अशोकला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत तो बुडाला होता. विहिरीला सुमारे सात ते आठ पुरुष पाणी असल्याने पोहोणाऱ्यांनाही मर्यादा येत होत्या. लागलीच काही जणांनी पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. प्रथम दोन व नंतर चार अश्वशक्तीच्या पंपाने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रयत्न सुरू होते. परंतु पाणी जास्त असल्याने व अंधार झाल्याने त्यात अपयश येत होते. त्यामुळे सकाळी मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय तरूणांनी घेतला. दरम्यान, चिमुकल्याच्या आईचा आक्रोश उपस्थितांची ह्रदये पिळवटून टाकणारा होता. तासाभरापूर्वी नजरेसमोर खेळणारा आपला चिमुकला अचानक बेपत्ता झाल्याने ती बेफान झाली होती. रात्रभर हे कुटुंब मुलाच्या विरहाने व्याकुळ झाले होते. शनिवारी भल्या सकाळीच बारागाव नांदूर येथून भारत बर्डे व सुनील बर्डे या दोघा पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे पाणी उपसण्याचे काम सुरू होते. बर्डे बंधूंचाही बराच वेळ मृतहेद काढण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटी अकरा वाजता सुनील बर्डेने घेतलेल्या एका दीर्घ बुडीत अशोकचा मृतहेद हाताला लागला. त्याने मृतदेह बाहेर काढताच खेमनर कुटुंबाने हंबरडा फोडला. (प्रतिनिधी)