शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

..अन् उलगडला पुनर्जन्माचा प्रवास

By admin | Updated: August 16, 2014 23:39 IST

मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात..

पुणो : मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात.. गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला परत पाठवून मिळवलेला पुर्नजन्म.. मदतीला धावून आलेले असंख्य हात.. रुग्णालयामधून घरी परतल्यानंतर त्यातून खंबीरपणो उभे राहण्याचा प्रवास उलगडला. निमित्त होते व्यावसायिक अशोक नवाल यांच्या मुलाखतीचे. त्यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये नवाल यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
आनंदयात्री प्रकाशनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये अशोक नवाल यांनी लिहलेल्या ‘रिबॉन अॅट 54’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह्याद्री रुग्णालयाचे संचालक डॉ. चारू आपटे, सुधीर गाडगीळ, अशोक नवाल, चित्र नवाल, सुशील नवाल उपस्थित होते.
डॉ. चारू आपटे म्हणाले, ‘‘नवाल हे 52 दिवस रुग्णालयामध्ये होते. या कालावधीमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारे किमान चार फोन तरी यायचे. आमची टीम तर प्रयत्न करीत होतीच; त्याचबरोबर नवाल याच्या परिवाराची खंबीर साथ  व त्यांची इच्छाशक्ती याचा मोठा हातभार लागला.’’ 
सुशील नवाल यांनी प्रास्ताविक केले. बिझसोल ग्रुपचे व्यंकटाचलम् यांनी आभार मानले.        (प्रतिनिधी) 
 
अपघातानंतरचा प्रवास 
4मुंबईतील काम आटोपून 17 जून 2क्क्9 रोजी रात्री अशोक नवाल पुण्याला परतत होते. पुण्यापासून 2क्-25 किलोमीटर अंतरावर असताना एका टेम्पोचालकाच्या चुकीमुळे नवाल यांच्या मोटारीला मोठा अपघात झाला. मोटारीमध्ये पाठीमागच्या सीटवर झोपलेले नवाल अपघानंतर आतमध्ये चेंबले जाऊन गंभीर जखमी झाले. मोटारीमध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये वाहनचालकाने नवाल यांच्या पत्नीला व मित्रंना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतरचा नवाल यांचा प्रवास या पुस्तकात आला आहे.  
 
 ‘भीषण अपघातातून पुनर्जन्म झाला, तो फक्त माणसातल्या माणुसकीमुळेच. या स्वार्थी जगामध्येही चांगली माणसे आहेत म्हणून हे जग खूप चांगलं आहे. सहानुभूतीपेक्षा कर्तव्यबुद्धीने मदत करणारी माणसे भेटली. त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने जगासमोर आणून त्यातून  इतरांना प्रेरणा मिळावी, हाच या लेखनामागचा हेतू होता.
                                  - अशोक नवाल,
                        लेखक, ‘रिबॉन अॅट 54’ 
 
आपल्यावर कितीही संकटे आली, तरी इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यातून बाहेर पडू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अपघानंतरचा अशोक नवाल यांचा प्रवास होय.
- विद्याधर पानट, 
ज्येष्ठ पत्रकार