शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दारूवरील करवाढीने मंत्र्यांत जुंपली!

By admin | Updated: October 1, 2015 03:34 IST

राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता दारूवरील करवाढीच्या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली.

मुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता दारूवरील करवाढीच्या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली. उत्पन्न वाढीकरिता प्रत्येकवेळी दारूवर करवाढ करणे आपल्याला मान्य नाही, असे सांगत उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी आपला आक्षेप नोंदविला, तर या करवाढीमुळे लोक कमी दारू प्यायले तर काही बिघडत नाही. उलट मायभगिनींचा दुवाच लाभेल, असे जोरदार प्रत्युत्तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचे समजते.सरकारची तिजोरी भरून काढण्याकरिता दारूवर करवाढ करण्याचा प्रस्ताव मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडताच खडसे यांनी त्याला आक्षेप घेतला. शेजारच्या राज्यातील दारूचे दर आणि महाराष्ट्रातील दर याचा सारासार विचार करून करवाढ केली पाहिजे. दारू पिण्याचे समर्थन आपण कधीच केले नाही आणि करीतही नाही. परंतु सरकारच्या अशा धोरणामुळे अवैध दारूची विक्री वाढेल. त्याच्या परिणामांचाही विचार व्हायला हवा, असे खडसे म्हणाल्याचे समजते. खडसे यांच्या या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी विरोध केला. आपण तर संपूर्ण दारूबंदीच्या मताचे आहोत. दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यायचा तर लागणारे पैसे कुठून आणायचे? दारु पिणे ही चैन आहे. त्यामुळे दारु पिणाऱ्यांवर थोडा भार पडला किंवा दरवाढीमुळे लोक कमी दारु प्यायला लागले तर काही बिघडत नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचे कळते. अवैध दारूचा सुळसुळाट रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. करवाढ केल्याने अवैध दारूचा पुरवठा वाढेल असा बागुलबोवा दाखवणे योग्य नाही, असेही मुनगंटीवार यांचे म्हणणे होते.राज्य मंत्रिमंडळातील भाजपा व शिवसेनेच्या मंत्र्यांनीही खडसे यांच्या भूमिकेला विरोध करीत दारुवरील करवाढीचे समर्थन केल्याने खडसे यांचा नाईलाज झाला. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खडसे यांच्या भूमिकेशी असहमती व्यक्त करीत प्रस्ताव मंजूर करवून घेतला. (विशेष प्रतिनिधी)----------वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार दारू विक्रीबंदीचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली. आता यवतमाळ जिल्ह्यातही दारुविक्री बंदीची मागणी होत आहे. दारुविक्रीवरील करवाढ करून मुनगंटीवार यांनी आपला इरादा आणखी पक्का केला.