शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर

By admin | Updated: September 24, 2014 13:49 IST

व्हॉट्सअँप, फेसबुक, हाईक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही नेत्याची बदनामी करणे, सामाजिक शांतता बिघडविणे वा कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार करणे आता परवडणार नाही.

 नासीर कबीर■ करमाळा

व्हॉट्सअँप, फेसबुक, हाईक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही नेत्याची बदनामी करणे, सामाजिक शांतता बिघडविणे वा कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार करणे आता परवडणार नसून गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ३ वर्षे कारावास ते ५ लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
लोकसभा निवडणूक काळात आपले सर्मथन असणार्‍या नेत्यांचे उदात्तीकरण करताना विरोधी नेतेमंडळींची चेष्टा उडविणारे, बदनामी करणारे मेसेज, फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात फिरत होते. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पुन्हा एकदा तशाच चुकीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे; मात्र आता सोशल मीडियाबाबत पोलीस यंत्रणा अधिक जागरुक झाली आहे. नेटकर्‍यांनी अशा प्रकारच्या घटनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडून शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता आहे.
गत लोकसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर झाल्याची उदाहरणे पुढे आली होती. राजकीय नेत्यांची चेष्टा करणारे मेसेज, फोटो, विनोद सोशल मीडियावर सातत्याने दिसत होते. आता विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवरही तशाच प्रकारांची पुनरावृत्ती होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणे महागात पडणार आहे. त्याचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय दंडविधान संहिता २९५/६६/अ अन्वये कायदेशीर कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह मजकूर, फोटो, विनोद याबाबत जागरुक राहणे आवश्यक बनले आहे.
 
सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारा मजकूर, बदनामीकारक फोटो असे काही आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर गैरप्रकार करणार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, करमाळा 
 
■ सोशल मीडियाच्या विश्‍वात एखादा मजकूर, फोटो, कॉपी, पेस्ट शेअर करतानाच तो लाईक करणे, त्यावर कॉमेंट देणे याची स्पर्धाच लागल्याचे दिसते आहे. मात्र हे करताना सावधानता बाळगली नाही तर कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा धोका आहे. तेव्हा व्हॉट्सअँप, फेसबुकचा वापर करताना डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.