दारुड्या बापाने मुलाला विकले

By Admin | Updated: June 22, 2014 00:52 IST2014-06-22T00:52:36+5:302014-06-22T00:52:36+5:30

पैशाच्या लालसेपोटी बापाने आपल्या मुलाला केवळ १० हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून

The eldest father sold the child | दारुड्या बापाने मुलाला विकले

दारुड्या बापाने मुलाला विकले

अमरावती जिल्ह्यातील घटना : १० हजार रुपयांमध्ये केला सौदा
अमृत काशीकर - पिंपरीपूर्णा
पैशाच्या लालसेपोटी बापाने आपल्या मुलाला केवळ १० हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पिंपरीपूर्णा येथील अनिता तुळशीराम गुळधे हिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर काळबांडे याचेशी झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. त्यानंतर शंकरने अनिताला दारू पिऊन त्रास देणे सुरु केले होते. परंतु याबाबत अनिताने कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे तिला होणारा त्रास वाढतच गेला. शेवटी यातना असह्य झाल्याने अनिता शंकरला सोडून दोन मुलांसह माहेरी परत आली. दरम्यान वर्षभरापूर्वी शंकरने त्याचा मुलगा सुरज शंकर काळबांडे (१४) याला कावेबाजपणे स्वत:सोबत अमरावती येथे आणले. चार ते पाच दिवस सोबत ठेवून त्याने सूरजला थेट बिहार प्रांतातील पटना येथे नेले. तेथील ढाब्याच्या मालकाकडून १० हजार रूपये घेऊन मुलाला तेथेच सोडून त्याने पळ काढला.
सूरजने त्याठिकाणी काही दिवस काम करुन सूरज ढाबामालकाची नजर चुकवून पळाला. त्याने थेट पटना रेल्वे स्टेशन गाठले. परंतु रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी सूरजला पकडले. त्याला पटना येथील अनाथालयात आणण्यात आले. तेथे सूरज एक वर्षपर्यंत राहिला. सूरजने दिलेल्या पत्त्याच्या आाधारे पटना पोलिसांनी चांदूूरबाजार पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर चांदूरबाजार पोलिसांनी पिंपरी येथे मुलाच्या आईला माहिती कळविली. सूरजची आई अनिता काळबांडे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही पटना येथील अनाथालय गाठले. तेथील अधीक्षकांची भेट घेऊन तिने सूरजला ताब्यात घेतले. ३ जून रोजी आई व मुलगा त्यांच्या गावी परत आले. याप्रकरणी पोलिसांनी शंकर काळबांडे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असणाऱ्या असून ठाणेदार दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: The eldest father sold the child