शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादातून आठ गावे अंधारात!

By admin | Updated: February 4, 2015 02:05 IST

दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़

संघरक्षित तावाडेल्ल जिवती (जि़ चंद्रपूर)दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़ मात्र, बील भरले नसल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी ८ गावांचा पुरवठा तोडण्यात आल्याने ही गावे अंधारात बुडाली आहेत़ दुसरीकडे वीजबीलच मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकूणच महाराष्ट्र व तेलंगण राज्याच्या सीमावादात ही गावे भरडली जात आहेत़ जिवती तालुक्याच्या सिमेवरील १४ गावे वादग्रस्त असून, या गावांत दोन्ही राज्यांच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पद्मावती, कामतगुडा या गावांना तेलंगणने वीज पुरवठा केला़ मात्र, दोन महिन्यांपूर्वी तो खंडित केला आहे़ परिणामी या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ या आठही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविले आहेत. जोपर्यंत येथील रहिवाशी डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीजजोडणी देता येणार नसल्याचे जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी स्पष्ट केले. तर या ठिकाणी आताच आलो असून, यासंदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगण राज्यातून वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणनेही वीज कापल्याने पिठगिरणी, शेतातील वीजपंप बंद पडले आहेत. अतिसंवेदनशिल व दुर्गम असलेली ही गावे अंधारात बुडाली आहेत़ राजीव गांधी ग्रामीण विकास योजनेतंर्गत या गावांसाठी डीपीपर्यंत खांब उभे केले आहेत. पूर्वी या गावात तेलंगणची वीज उपलब्ध असल्याने गावात खांब व तार टाकले नाहीत. येथील लोकांकडून डिमांड मागितले; पण डिमांड अर्ज प्राप्त न झाल्याने खांब उभे केले नाहीत. - के.एन. पिदूरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, बल्लारपूर विभागसीमावर्ती भागातील ग्राहक वीजबिल भरत नसल्याने वीजजोडणी कापण्यात आली. वीजबील भरणा केल्यानंतर पुरवठा पूर्ववत केला जाईल. - पी. रवींद्र, लाईनमन,चेरामेरी (तेलंगण)सीमावर्ती भागातील आठ गावांचे वीज कनेक्शन कापल्याची आपल्याला माहिती नाही. असा प्रकार असल्यास खरोखर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करू. - पी. श्रीनिवासन जय, सहायक अभियंता, बेलमपूर विभाग (तेलंगण)