शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत राज्यभरात आठ जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: October 29, 2016 01:59 IST

पोहायला गेलेल्या सात किशोरवयीन मुलांसह एका मध्यमवयीन गृहस्थावर काळाने क्रुरपणे घाला घातल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरांत अंध:कार पसरला आहे.

औरंगाबाद/चंद्रपूर : पोहायला गेलेल्या सात किशोरवयीन मुलांसह एका मध्यमवयीन गृहस्थावर काळाने क्रुरपणे घाला घातल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरांत अंध:कार पसरला आहे. शुक्रवारी पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या औरंगाबादेतील चौघांचा, तर गुरुवारी सायंकाळी नदीपात्रात पोहोयला उतरलेल्या चंद्रपुरातील दोघांचा आणि नागपुरातील पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाला.औरंगाबादेमधील कन्नड तालुक्यातील उंबरखेड गावाजवळच्या आदर्श वसाहतीत राहणारे कृष्णा चरणदास राठोड (१६), उमेश कैैलास पवार (१५), आकाश जयलाल पवार (१५) व रामेश्वर पंडित पवार (१५) हे चौैघे मित्र शुक्रवारी पोहण्यासाठी पाझर तलावावर गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेही बुडू लागले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे काही लोक धावत आले. कृष्णा व रामेश्वरला बेशुद्धावस्थेत तलावाबाहेर काढून तातडीने कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. तर उमेश व आकाशचे मृतदेह सायंकाळी गावकऱ्यांच्या हाती लागले.दुसऱ्या घटनेत चंद्रपुरामधील भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरात वर्धा नदीमध्ये बुडून एवंत पारसनाथ भारती (१६) व जावेद आलमगीर अन्सारी (१७) या मित्रांचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. वाढदिवसाच्या पार्टीनंतर ते पोहायला उतरले होते. त्यापैकी एवंतचा मृतदेह शुक्रवारी दुपारी, तर जावेदचा मृतदेह सायंकाळी सापडला आहे. एवंत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शुशगंगा इजिंनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता, तर जावेद माजरी येथील हिंदी महाविद्यालयात शिकत होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुलासह वडिलांचा नरखेडमध्ये बळीतिसरी घटना नागपुरातील नरखेड तालुक्यात रोहणा येथे गुरुवारी संध्याकाळी घडली. नदीपात्रात पोहताना अक्षय सुभाष लोलुसरे हा मुलगा बुडाल्याने त्याच्या शोधासाठी पाण्यात उतरलेले त्याचे वडील सुभाष यांचाही बुडून मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आले.