शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून आठ दिवस पावसाचे

By admin | Updated: September 7, 2015 01:49 IST

केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे

मुंबई : केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सप्टेंबरचा उत्तरार्ध कोरडाच जाईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून राजस्थानातून परतीच्या प्रवासाला लागल्याची घोषणा शुक्रवारीच केली आहे. त्यानंतर परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासह मुंबईवरील पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. तत्पूर्वी द्रोणीय स्थितीमुळे वर्तविण्यात आलेल्या ठिकाणी पावसाने जोर धरला तर राज्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. आणि दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या वातावरणीय बदलामुळे राज्यासह मुंबईत कोरडेच वातावरण राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. शिवाय ६, ७, ८, ९ आणि १० सप्टेंबर रोजी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची चिन्हे आहेत. तर पुढील ४८ तासांत मुंबईवरील आकाश ढगाळ राहील व हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)चक्रवात स्थितीस्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप आणि त्यालगतच्या भागावरील वातावरणात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीचा प्रभाव तेलंगणापासून कर्नाटकाहून पुढे लक्षद्वीपपर्यंत आहे. त्यामुळे दक्षिण कर्नाटकातील भाग, कर्नाटकची किनारपट्टी आणि त्यालगतचा तामिळनाडूचा भाग तसेच उत्तर केरळ या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची आशा आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे.