शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शिक्षण विभाग सुरू करणार ' शैक्षणिक चॅनल '

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:39 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल

ठळक मुद्देसध्या चॅनल सुरू करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू प्रवेशपूर्व परीक्षांचे व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक कार्यक्रमही

राहुल शिंदे -पुणे: विद्यार्थ्यांना घरबसल्या आपल्या पुस्तकातील विविध घटकांची उजळणी करता यावी, अवघड वाटणारा विषय सहज समजावा, कविता चालीमध्ये कशा म्हणाव्यात, गणित कसे सोडवावे आदींचे ज्ञान राज्यातील विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावरून (टीव्ही) मिळू शकणार आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्टॉनिक माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्वयंम’च्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता देशातील सर्व राज्यांनी आपल्या बोलीभाषेतील शैक्षणिक चॅनल सुरू करावे,अशा सूचना एमएचआरडीकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी ) अधिका-यांनी नुकतीच गुजरात राज्यातील शैक्षणिक चॅनलची पाहणी केली आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, एमएचआरडीकडून सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शैक्षणिक चॅनल सुरू करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले. या पत्रानुसार गुजरात येथील शैक्षणिक चॅनलची पहाणी करण्यात आली आहे. सध्या चॅनल सुरू करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. मात्र, पुढील काळात राज्याच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र चॅनल सुरू झाले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कार्यक्रम घर बसल्या पाहता येतील. एससीईआरटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम तयार करता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेशपूर्व परीक्षांचे व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक कार्यक्रमही दाखवता येतील.--------बालचित्रवाणी का बंद पाडली ? मुला  मुलांची... मजे मजेची... बालचित्रवाणी... हे बोल कानावर पडले की विद्यार्थी दूरचित्रवाणी संचासमोर येऊन बसत होतो.केंद्र शासनाच्या आर्थिक सहकार्याने १९८४ मध्ये मुंबईत बालचित्रवाणी सुरू झाली. दोन वर्षानंतर १४ नोव्हेंबर १९८६ रोजी बालचित्रवाणीचे कामकाज पुण्यातून सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठी हजारो शैक्षणिक कार्यक्रम बालचित्रवाणीने तयार केले. बालचित्रवाणीचे कार्यक्रम पाहूनच अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. परंतु, केंद्र शासनाने २००३ पासून अनुदान देण्याचे बंद केल्यामुळे बालचित्रवाणीला टाळे लावावे लागले. आता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यक्रम पाहून अभ्यास करावा, ही भूमिका समोर ठेऊन एमएचआरडीने सर्व राज्यांना शैक्षणिक चॅनल सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मग पुण्यातील ‘बालचित्रवाणी’ का बंद पडली? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षणTelevisionटेलिव्हिजनTeacherशिक्षक