ईडीची संजय राऊतांच्या भावाला नोटीस; 30 जानेवारीला हजर राहावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 08:30 PM2024-01-28T20:30:28+5:302024-01-28T20:30:54+5:30

ईडी स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह कंपन्यांच्या पेमेंट तपशीलांची तपासणी करत आहे. या कंपन्यांवर खिचडी घोटाळा आणि गुन्ह्यातील रक्कम वळवल्याचा आरोप आहे.

ED notice to Sanjay Raut's brother Sandeep Raut Khichdi COVID scam case; Must be present on 30th January | ईडीची संजय राऊतांच्या भावाला नोटीस; 30 जानेवारीला हजर राहावे लागणार

ईडीची संजय राऊतांच्या भावाला नोटीस; 30 जानेवारीला हजर राहावे लागणार

ईडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भावाला नोटीस पाठविली आहे. खिचडी घोटाळ्यात ही नोटीस पाठविण्यात आली असून ३० जानेवारीला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

 कोरोना महामारीच्या काळात खिचडी वितरणात गुंतलेल्या एका फर्मकडून संदीप राऊत यांना पैसे मिळाल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणी ईडीने शिवसेनेचे उबाठा गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. याच प्रकरणात राऊत यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. 

ईडी स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह कंपन्यांच्या पेमेंट तपशीलांची तपासणी करत आहे. या कंपन्यांवर खिचडी घोटाळा आणि गुन्ह्यातील रक्कम वळवल्याचा आरोप आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या लाटेत फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस (एफओएमएस) या सुरक्षा फर्मने सुनील कदम उर्फ बाला याच्या मदतीने बीएमसीचे कंत्राट मिळवले होते. कदम या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्सना खिचडीची पाकिटे पुरवतील, असे म्हटले होते. बीएमसीने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला ८.६४ कोटी रुपये दिले होते, असे सुरज चव्हाणने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात म्हटले आहे. 

सह्याद्री रिफ्रेशमेंटने बीएमसीकडून मिळालेल्या पेमेंटचा काही भाग संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचा भाऊ संदीप यांच्या खात्यात वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. खिचडी पुरवठादारांनी मान्यतेपेक्षा कमी प्रमाणात पुरवठा करून आणि वाढीव बिले सादर करून बीएमसीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Web Title: ED notice to Sanjay Raut's brother Sandeep Raut Khichdi COVID scam case; Must be present on 30th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.