शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, रोजगार गेले; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 9:55 PM

पाच वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत. त्यांनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

नांदेड - पाच वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत. त्यांनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रचारसभा आज नांदेड येथे झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि शेतीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली. ''मोदींनीगब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मोदींनी  जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली,''असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार आणि शेतीला हमीभाव देण्याचा आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात फसवणूक झाली, अशी टीका राहुल गांधींनी केली. यावेळी राफेल विमान करारावरूनही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी चौकीदारी कोणाची केली. शेतकऱ्याची केली नाही, अनिल अंबानीची केली. ३० हजार कोटी थेट अनिल अंबानीला फायदा झाला.  राफेल प्रकरणी मी नरेंद्र मोदींना संसदेत प्रश्न विचारले. किंमत का वाढली, अंबानीलाच का काम दिले, एचएएल ला काम का दिले नाही. पण माझ्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. नरेंद्र मोदी संसदेत दीड तास बोलले, नेहरु, इंदिरा गांधी, सगळ्यावर बोलले पण राफेलवर काहीच बोलले नाहीत,'' असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधीच्या भाषणातील अन्य महत्त्वाचे मुद्दे

- श्रीमंतांचे पैसे माफ होऊ शकतात, अनिल अंबानीचे पैसे माफ होऊ शकतात तर तुमच्या खात्यात ७२ हजार का जमा होऊ शकत नाहीत- नोटाबंदीच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी फक्त तमाशा केला, काळा पैसा आणतो म्हणून. तुम्हाला एटीएमच्या रांगेत उभे केले- २०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यानंतर स्वतंत्र कृषी बजेट सादर केले जाईल- कर्ज फेडू न शकलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला जेलमध्ये जावे लागणार नाही. काँग्रेसचे सरकार येताच कायद्यात योग्य ते बदल केले जातील-  नरेंद्र मोदी माझ्याबरोबर आमने-सामने चर्चा करावी. राफेलसंदर्भात दोन तीन प्रश्न विचारतो. पण चौकीदार घाबरतो. भ्रष्टाचारावर चर्चा करु- महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे. काम कसे करावे याची दिशा महाराष्ट्र देशाला देतो 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019