शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल

By admin | Updated: December 11, 2015 01:58 IST

राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली, तर मानवी हक्कांचे योग्य संरक्षण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले. मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेने असा सर्वांगीण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरिबीचे मुळापासून उच्चाटन करणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील. असंघटित क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल,’ असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नीतीचा वापर करावा लागेल.>>>> हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणतील बदल, यांचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ, यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवासमोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थितांनी प्रतिज्ञा करत शपथ घेतली.