शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:14 IST

मोदी आणि भाजपावर चढविला हल्ला

बारामती : भाजपाने गेल्या पाच वर्षांत १२५ कोटी जनतेचा भ्रमनिरास केला. ‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली. ‘अच्छे दिन’ नको, पहिले दिन बरे होते, असे म्हणण्याची लोकांवर वेळ आली आहे. भाजपा सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे रयत भवनमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये खात्यावर आणण्यासह विविध स्वप्न दाखविली. त्याला लोकांनी भुलून मतदान केल्याने त्यांचे सरकार सत्तेवर आले. निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची मोदी सरकारने पूर्तता केली नाही. प्रतिवर्षी दिलेले २ कोटी रोजगारांचे आश्वासन हवेत विरले. उलट गेल्या चार-पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळालीच नाही. उलट कांद्यासारखी शेती उत्पादने मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. साखर निर्यात होत नाही. साखरेच्या दरासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते. मात्र, या सरकारला शेतकऱ्यांचे घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला विरोध केला; मात्र केंद्रात सत्तेवर आल्यावर ‘वन नेशन, वन टॅक्स’ अशी घोषणा करीत लागू केला. २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी करआकारणी केली आहे. त्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. व्यापारी वर्ग त्यामुळे नाराज आहे.’’ नोटाबंदीमुळे सगळ्यांचे वाटोळे झाले. सर्जिकल स्ट्राईकचेदेखील राजकारण होत आहे. देशात यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतली नाही. गेल्या साडेचार वर्षामध्ये सर्वाधिक जवान शहीद झाल्याचे पवार म्हणाले.या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती संजय भोसले, सदाशिव सातव, सचिन सातव, किरण गुजर, प्रदीप गारटकर, योगेश जगताप, रोहिणी तावरे, बिरजू मांढरे, संदीप जगताप, सुभाष ढोले, शौकत कोतवाल, जवाहर वाघोलीकर आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचा बेरजेच्या राजकारणाचा सल्लालोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर समन्वय ठेवून बेरजेचे राजकारण करा. आता आठवण आली का आमची, इतके दिवस कोठे होता, अशीही त्यांच्याकडून विचारणा होईल. मात्र, आपण त्यांना बरोबर घेऊन प्रचारात सामील करून घ्या. शिवाय काही भागात दुष्काळाची तीव्रता आहे.पाणी नाही, चारा नाही, सर्वत्र रणरणते ऊन आहे. हाताला काम नाही. तिथेदेखील नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना समजून घेऊन आधार देण्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.ताकाला जायचं अन् भांडं लपवायचं कारण नाहीवाईट वाटून घेऊ नका; मात्र २०१४मध्ये सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा बारामती तालुक्यातील पारवडीसह विविध गावांमध्ये महादेव जानकर यांना झालेल्या मतदानाचे प्रमाण अधिक होते. यावरून काहीतरी चुकीचे घडत आहे, काही लोकांनी समाज डोक्यात घेतल्याचे जाणवत आहे. ताकाला जायचं भांडं लपवायचं कारण नाही. पूर्वीच्या काळात स्वर्गीय जगन्नाथ कोकरे यांचे जावई विजयराव मोरे निवडणुकीला उभे होते. मात्र, कोकरे यांनी ‘जावयाचा मानपान ठेवू, जेवायला घालू, पोशाख करू; पण मत मात्र शरद पवार यांनाच देऊ,’ अशी भूमिका घेतली. खरी निष्ठा अशी असावी, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी