"कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसचा गंभीर धोका वेळीच ओळखून उपाययोजना करण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 06:31 PM2021-05-09T18:31:03+5:302021-05-09T18:34:51+5:30

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांना सूचना. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित करण्यात आला मुद्दा.

dr shrikant shinde on mucormycosis risk after coronavirus and steroid medicine cm uddhav thackeray video conference | "कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसचा गंभीर धोका वेळीच ओळखून उपाययोजना करण्याची गरज"

"कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसचा गंभीर धोका वेळीच ओळखून उपाययोजना करण्याची गरज"

googlenewsNext
ठळक मुद्देस्टेरॉईडसाठीही टास्क फोर्स स्थापन करण्याच्या श्रीकांत शिंदे यांच्या सूचनाम्युकरमायकोसिस आजाराविषयी जनजागृती करण्याचंही शिंदे यांचं आवाहन

कल्याण-कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस या गंबीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे रुग्णांना डोळे गमाविण्याची वेळ येत आहे. त्याच्यावर वेळीच उपाययोजना करण्याची सूचना कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरसन्समध्ये हा मुद्दा खासदार शिंदे यांनी उपस्थित केला. या कॉन्फरन्समध्ये कोविड टास्क फोर्स टीमचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, राहूल पंडित आदी सहभागी होते. जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशी इंफेक्सनचा धोका वाढतोय हा मुद्दा उपस्थित केला. चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीत म्युकरमायकोसीस आजार होतो. डोळे व मेंदूवर त्याचा परिणाम होतो. कोरोना उपचारा दरम्यान स्टेरॉईडससारख्या औषधामुळे शरीरात संसर्ग वाढत असून अनियंत्रित मधूमेह आणि कोरोनावरील उपचारा दरम्यान साईड इफेक्टमुळे  रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासाठी फोटेरिसिन बी या इंजेक्शन वापराने इलाज करता येतो. या निदानासाठी असलेले हे औषध खुप खार्चिक असून आज ज्याप्रमाणे कोरोनावर रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्याच प्रमाणे या इंजेक्शनचा तुटवडा भविष्यात भासू शकतो. त्यासाठी आत्ताच नियोजन करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
 
स्टेरॉईडसाठीही टास्क फोर्स स्थापन करा

रुग्णालयातील ऑक्सीजन गरज आणि पुरवठा यांच्या ऑडीट करीता कोविड टास्क फोर्स कार्यरत आहे. त्याच धर्तीवर स्टेरॉईडस सारख्या औषधांच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाटी टास्क फोर्स स्थापन करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.
 



म्युकरमायकोसिस आजाराविषयी जनजागृती करावी

"म्युकरमायकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्य़ाला सूज येणो, लाल होणो, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणो आढळून येतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. सरकारने त्यासाठी चाचण्या व तपासण्याकरीता जनजागृती करावी," अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे.

Web Title: dr shrikant shinde on mucormycosis risk after coronavirus and steroid medicine cm uddhav thackeray video conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.