Breaking: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 08:06 PM2021-02-25T20:06:40+5:302021-02-25T20:14:57+5:30

Dr Prakash Amte Corona Positve: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. 

dr prakash amte found corona positive | Breaking: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

Breaking: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

googlenewsNext

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr Prakash Amte) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. (dr prakash amte corona positive)

डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम पाहातात. गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप होता. त्यांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली होती. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 

डॉ. प्रकाश आमटे यांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार आमटे यांना नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदवन, लोकबिरादारी प्रकल्प आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

डॉ. प्रकाश आमटे हे भारत सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगेसेसे, मदर तेरेसा पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. 

कोरोनामुळे जीवनशैलीत बदल करण्याची गरज 
कोरोनानंतर शहारातील माणसांनी जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचं मत डॉ. प्रकाश आमटे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. "कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही", अशी खंत देखील डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली होती.

Read in English

Web Title: dr prakash amte found corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.