शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कापगतेविरुद्ध दोष सिद्ध

By admin | Updated: December 30, 2014 01:00 IST

कळमन्यातील महाकाळकर सभागृहासमोर घडलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील डॉ. प्रशांत नाकाडे हत्याकांड खटल्यात आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने

डॉ. प्रशांत नाकाडे हत्याकांड : आज सुनावणार शिक्षा, फाशी की जन्मठेप?नागपूर : कळमन्यातील महाकाळकर सभागृहासमोर घडलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील डॉ. प्रशांत नाकाडे हत्याकांड खटल्यात आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने आरोपी डॉ. राजेंद्र कापगते यांना दोषी ठरवले. उद्या, मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपीला जन्मठेप किंवा फाशी, या दोनपैकी कोणतीही एक शिक्षा होऊ शकते. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत प्रशांत नाकाडे हे आरोपी कापगते यांचे साळे होते. प्रशांत हे होमिओपॅथी डॉक्टर होते. कापगते हे एमबीबीएस आहेत. साकोली येथील ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत. आरोपी कापगते यांची पत्नी नीता ही पतीच्या मानसिक व शारीरिक छळामुळे आपल्या माहेरी राहत होती. प्रशांतमुळेच आपली पत्नी आपल्यापासून वेगळी राहते. ती सासरी नांदायला परत येत नाही, असा समज कापगते यांना होता. प्रशांत नाकाडे हे आपल्या कुटुंबाला घेऊन १२ फेब्रुवारी २०११ रोजी कळमन्याच्या महाकाळकर सभागृह येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. धमकीनंतर झाडल्या गोळ््यानागपूर : लग्नसमारंभानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास प्रशांत यांचा काका भय्या नाकाडे यांच्यासोबत कापगते यांनी भांडण केले होते. ‘माझ्या पत्नीला तुम्ही पाठवत नाही. त्यामुळे तुला आणि प्रशांतला जीवे मारून मी जेल भोगत बसेल’, अशी धमकी कापगते यांनी दिली होती. दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास प्रशांत नाकाडे हे आपली पत्नी आशाताई आणि इतर नातेवाईकांना आपल्या ट्रॅक्समध्ये बसवून गावाकडे परत जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी प्रशांत यांच्याकडून कोणतेही कृत्य घडले नसताना कापगते यांनी सरळ प्रशांतच्या दिशेने येऊन आपल्या पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. डॉ. प्रशांत नाकाडे यांच्या पोटावर आणि बरगड्यांवर दोन गोळ्या झाडून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आशाताई प्रशांत नाकाडे यांच्या तक्रारीवरून डॉ. राजेंद्र कापगतेविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलीस निरीक्षक अनिल चौधरी यांनी तपास करून, आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. (प्रतिनिधी)सदोष मनुष्यवध नव्हे, खूनच!न्यायालयात बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला होता की, मृत प्रशांत यांनी बहिणीवरून आरोपी कापगते यांना अपशब्द वापरले होते. त्याचा राग येऊन आरोपीने गोळ्या झाडल्या. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे नाकारले. तपासलेली फिर्यादी व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरली. सदोष मनुष्यवध नसून हा खूनच आहे, म्हणून आरोपीला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत दोषी ठरवले जात आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. उद्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. न्यायालय शिक्षेवर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. नीरज खांदेवाले तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अविनाश गुप्ता काम पाहत आहेत. जामीन प्रकरण गेले होते सर्वोच्च न्यायालयातडॉ. राजेंद्र कापगते यांच्या जामिनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे ते कारागृहाबाहेर आले होते. प्रशांत नाकाडे यांच्या पत्नी आशाताई नाकाडे यांनी जामीन रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आशातार्इंचा अर्ज मंजूर करीत उच्च न्यायालयाने कापगते यांचा जामीन रद्द केला होता. आरोपीला शरण येण्याचा आदेश जारी केला होता. मात्र आरोपीने या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याची मुदत देत आरोपीच्या जामिनावर नव्याने निर्णय द्यावा, असे निर्देश सत्र न्यायालयाला केले होते. त्यावर सत्र न्यायालयाने नव्याने आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करून जामीन रद्द केला होता. त्याच वेळी कापगते हे न्यायालयातच शरण आले होते.