शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी २00; डाळ मात्र १0३ रुपयांना!

By admin | Updated: August 25, 2016 01:36 IST

.१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

बापू बैैलकर,

पुणे- दिवसभर कष्ट करून कधीतरी २०० रुपये मिळतात...१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यातील १५ गोदामांमधून १३ तालुक्यांतील १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थ्यांसाठी रेशनवर तूरडाळ वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, १०३ रुपयांना किलो या दराने ती मिळणार असल्याने लाभार्थी ती घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूरडाळीची मोठ्या प्रमाणात साठेबाजी झाल्याने काही महिन्यांपूर्वी डाळीचे दर १८० रुपयांपर्र्यंत गेले होते. राज्य सरकारने ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करून हजारो क्विंटल तूरडाळीचा साठा जप्त केला होता. जप्त केलेली डाळ १०० रुपये भावाने खुल्या बाजारात आणण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे आता शासनाने गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून माफक दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांत बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना महिन्याला एक किलोप्रमाणे वाटप होणार आहे. १0३ रुपये किलो या दराने ती वाटली जाणार आहे. जिल्ह्यासाठी १८३१ क्विंटल म्हणजे १ लाख ८३ हजार ५0८ किलोचा पुरवठा झाला असून, तो १५ गोदामांमध्ये आला आहे.. तालुक्यातून शिधा पत्रिकाधारकांच्या संख्येप्रमाणे वाटप सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप दुकानदारांनी माल उचलला नाही. कारण ती डाळ माथी पडण्याची शक्यता आहे. स्वस्त धान्य दुकानातून एका कुटुंबास १ किलो डाळ देण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून आहेत. १0३ रुपये किलोप्रमाणे चलन भरून घेतले जात आहे. मात्र, एकवेळी बीपीएल कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने ते डाळ घेतील, मात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारक हे निराधार असल्याने त्यांच्या कुटुंबात एकच सदस्य असल्याने त्यांना १0३ रुपये कसे परवडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेशनवर ही डाळ गेली, तरी ती उचचली जाणार नसल्याने दुकानदारांच्या माथी ही डाळ पडणार आहे. त्यातच खुल्या बाजारात डाळीचे भाव कमी असताना गरीब लोक ही डाळ घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाकीचे धान्य २ व ३ रुपयांनी मिळत असेल व तूरडाळ खुल्या बाजारात ९५ रुपयांना उपलब्ध असेल, तर ८ रुपये जास्तचे देऊन गरीब लोक ती खरेदी करणार नाहीत. मुळशी तालुक्यातील सर्व दुकानदारांनी चलन भरले आहे, मात्र साठा उचललेला नाही. ही डाळ विक्री होणार की नाही हे अद्याप सांगता येत नाही. - धनंजय दाभाडे, अध्यक्ष, मुळशी, रेशन दुकानदार संघटना