शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Exclusive: मुख्यमंत्री व्हायचा विचार आहे का?; गिरीश महाजन म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:44 PM

मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं स्मार्ट उत्तर

मुंबई: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. सरकारविरोधात निघालेल्या मोर्च्यांना, आंदोलनांना सामोरं जाऊन यशस्वी शिष्टाई करण्याची कामगिरी महाजन यांनी अनेकदा पार पाडली आहे. आंदोलकांच्या समस्या ऐकून समेट घडवण्याचं काम महाजन यांनी यशस्वीपणे केलं आहे. मुख्यमंत्र्यांना मदत करताना कधी स्वत:च मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का, असा प्रश्न महाजन यांना लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये विचारण्यात आला. राजकीय पेचात टाकणाऱ्या या प्रश्नाला सरकारचे संकटमोचक महाजन यांनी खुबीनं उत्तर दिलं. 'तुम्ही सरकारविरोधातील मोर्च्यांना सामोरे जातात. अनेकदा त्यांच्यासोबत रस्त्यावरुन चालतात. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी तुमची ओळख आहे. आपण मुख्यमंत्री व्हावं, असा विचार कधी डोक्यात आला का?', असा प्रश्न लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये महाजन यांना विचारला गेला. त्यावर 'मी माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत आहे. माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. असा विचार कधीच माझ्या मनात आलेला नाही,' असं उत्तर महाजन यांनी दिलं. 

भाजपाचं सरकार आल्यानंतर मोर्चे, आंदोलनं यांचं प्रमाण वाढलं. त्याचं कारण काय, असा प्रश्न विचारल्यावर महाजन यांनी लोकांच्या अपेक्षा वाढल्याचं सांगितलं. यासोबतच मुख्यमंत्र्यांचंही कौतुक केलं. 'लोकांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील आहेत. ते प्रश्न समजून घेतात. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात,' असं महाजन म्हणाले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री