शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कामांच्या आड निवडणुकीचे कारण आणू नका: उच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:22 IST

Mumbai High Court News: मोठ्या मनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीही मिळेल, असे स्पष्ट करत शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना एक आठवड्याच्या आत लाभ देण्याचा विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी केली.

 मुंबई -  राज्य सरकार विजेच्या वेगाने निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांच्या आड निवडणूक येऊ शकत नाही. मोठ्या मनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीही मिळेल, असे स्पष्ट करत शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना एक आठवड्याच्या आत लाभ देण्याचा विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी केली. पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होईल. 

दहशतवाद्यांच्या ताब्यातून ओलिसांची सुटका करताना २० मे २०२० रोजी अनुज सूद शहीद झाले. त्यांची पत्नी आकृती सूद यांनी २०१९ व २०२०च्या सरकारी अधिसूचनांनुसार दरमहा भत्ता व अन्य लाभ यांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. देशासाठी बलिदान देणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी ‘मोठ्या मनाने’ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धी मिळेल, असे यावेळी न्यायालय म्हणाले. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने निर्णय घेण्यासाठी चार आठवडे द्यावेत, अशी विनंती सरकारी वकिलांनी खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठाने ही मुदत जास्त असल्याचे म्हणत उपर्युक्त सूचना केली.

हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, हे तुम्ही (मुख्यमंत्री) अधिकाऱ्यांच्या मनावर ठसवाल. अशा प्रकारच्या प्रस्तावाला एक दिवसही विलंब होता कामा नये. खरेतर, अशा व्यक्तींचा महाराष्ट्राला अभिमान असायला हवा. आपले हृदय मोठे असायला हवे. आपण देशातील एकमेव असे राज्य आहे, ज्यामध्ये ‘महा’, असा शब्द आहे.- मुंबई उच्च न्यायालय

म्हणून सरकारी धोरणाचा लाभ देण्यास नकार -आकृती सूद यांनी केलेल्या याचिकेनुसार, सूद कुटुंबाचे महाराष्ट्रात घर आहे. अनुज सूद यांना पुण्यात राहायचे होते, हे कागदपत्रांवरून सिद्ध होते. - मात्र, त्यांच्याकडे १५ वर्षांच्या अधिवासाचा पुरावा नसल्याने तसेच ते या राज्यात जन्मलेले नसल्याने त्यांना सरकारी धोरणाचा लाभ देण्यास नकार देण्यात आला. - प्रशासकीय विभागाच्या अडचणींमुळे आता निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे, असे सामान्य प्रशासकीय विभागाच्या सहायक सचिवांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार