शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीची मुंडेंना होती विशेष भुरळ

By admin | Updated: June 4, 2014 00:01 IST

महापालिका असो की ग्रामपंचायत भाजपाचा विजय हा निश्तिच समजायचा अशा शब्दांत गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी डोंबिवलीकरांचे तोंडभरून कौतुक केले होते.

अनिकेत घमंडी - ठाणो
रामभाऊ म्हाळगींपासून ते राम कापसेंर्पयत आणि त्यानंतर जगन्नाथ पाटील यांच्यापासून ते सध्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यार्पयत ग्3क् हून अधिक वर्षे डोंबिवली हा भाजपाचा गड म्हणून सबंध देशभर ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी कोणालाही उभे करा, लोकसभा असो की विधानसभा, महापालिका असो की ग्रामपंचायत भाजपाचा विजय हा निश्तिच समजायचा अशा शब्दांत गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी डोंबिवलीकरांचे तोंडभरून कौतुक केले होते. अतिशय सुरक्षित आणि विश्वासाचा मतदारसंघ असे वर्णन करतांना ते बीड आणि डोंबिवलीचा उल्लेख आवजरून करायचे.
विधानसभेवर भगवा फडकवत उपमुख्यमंत्री, पक्षाचे उपनेते, अगदी केंद्रार मंत्री झाल्यार्पयत ज्यांच्याशी सल्लामसलत करणारे भाजपाचे कॅबिनेट दर्जाचे माजी वनमंत्री डोंबिवलीकर असलेल्या जगन्नाथ पाटील यांनी मुंडेंच्या आठवणी सांगितल्या. ख:या अर्थाना भाजपा पोरका झाला, पक्षाची ही पोकळी कधी भरून येईल, असे वाटत नाही असेही ते म्हणाले. 
‘लोकमत’शी मुंडे-पाटील यांच्या मैत्रीसंबंधांबाबत सांगतांना ते म्हणाले की, अतिशय परखड, स्पष्ट मात्र मनमिळावू कोणालाही न तोडता ‘वेगळेच’ राजकारण करणारे असे ते नेते होते. कधीही डोंबिवलीत आले की, पाटील बंगल्यावर आल्याशिवाय परतीचा प्रवास करायचा नाही हा त्यांचा शिरस्ता. त्यामुळे घरातील मुलींच्या लग्नाला, गणपतीला आणि कधी सभेला आले की साधे भोजन करण्यासाठी ते याठिकाणीच यायचे. मंत्रिमंडळात काही चुका झाल्या तर त्या तातडीने सांभाळून घेत सर्वाना धीर देण्याचे सातत्याने कार्य त्यांनी केले.
1982 च्या निवडणुकीत मुरबाडमध्ये महिनाभर तळ : रामभाऊ म्हाळगी यांच्या निधनानंतर तातडीने पाटील यांना तिकीट मिळाले. तेव्हा दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या प्रचारासाठी आले होते. मुंडेंनी तर महिनाभर मुरबाडमध्ये दिवसरात्र प्रचार केला होता. त्यांची जुनी जीप घेऊन ते आले होते. रस्तेही नव्हते त्याठिकाणी एखाद्या सर्वसामान्य कार्यकत्र्याच्या दुचाकीवर - सायकलवर प्रवास करत त्यांनी प्रचार केला, मुरबाडच्या शिवाजी पुतळ्यामागील बाजूस शहा आणि दादासाहेब पोतदार यांच्याकडे ते निवासाला होते. रात्रंदिवस एक करून प्रचार केला आणि त्यातून विजयश्रीही सहज मिळाली.
महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी डोंबिवलीतील सभेला आले होते. तेव्हा डॉ. शिंदे, कपिल पाटील यांची नावेही जाहीर झाली नव्हती. त्या सभेदरम्यान माङयाशी मुंडे म्हणाले की, तिकीट मिळायला अडचण वाटते, आणखी प्रय} करा. असे ते स्पष्टवक्ते होते. 
 
च्स्वत:नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही माङयाकडून काहीजणांनी भिवंडी लोकसभेतून तिकीट मिळवण्यासाठी प्रय} केले होते. मात्र ते मिळाले नाही. तेव्हा महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ते वेळात वेळ काढून डोंबिवलीतील सभेला आले होते. तेव्हा डॉ. शिंदे, कपिल पाटील या कोणाची नावेही जाहीर झालेली नव्हती.