शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय परिषदेने डॉक्टर्सना फटकारले

By admin | Updated: June 11, 2015 02:11 IST

एखादा आजार झाल्यावर फॅमिली डॉक्टरकडे जाण्यापेक्षा स्पेशालिस्टकडे जाण्याचा रुग्णांचा कल असतो. पण अनेकदा डॉक्टरने लावलेली स्पेशालिस्टची

मुंबई : एखादा आजार झाल्यावर फॅमिली डॉक्टरकडे जाण्यापेक्षा स्पेशालिस्टकडे जाण्याचा रुग्णांचा कल असतो. पण अनेकदा डॉक्टरने लावलेली स्पेशालिस्टची पदवी ही प्रमाणित अभ्यासक्रमातून मिळालेली नसते. यामुळे रुग्णांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील सुमारे ६०० ते ७०० डॉक्टरांना पत्र पाठवली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी सांगितले. डॉक्टरने संपादित केलेली पदवी पाहून अनेकदा रुग्ण विशिष्ट आजारावर उपचार घेण्यासाठी त्याच डॉक्टरकडे जातात. एमडी, एमएस अशा पदव्या नावापुढे लावलेल्या डॉक्टरांनी घेतलेली पदवी अनेकदा प्रमाणित नसते. या संदर्भातील ३० हून अधिक तक्रारी राज्यातील विविध भागांतून परिषदेकडे आल्या. यानंतरच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन परिषदेने पत्र पाठविली आहेत. एमबीबीएसचा अभ्यासक्रम अनेक डॉक्टरांनी राज्यातूनच पूर्ण केला आहे. मात्र त्या पुढील शिक्षण त्यांनी परदेशातील महाविद्यालयातून घेतले आहे. तो अभ्यासक्रम प्रमाणित नसतानाही त्यांनी ती पदवी आपल्या नावापुढे लावणे अयोग्य आहे. यामुळे रुग्णांची फसवणूक होते. डॉक्टरांनी अशाप्रकारे पदव्या नावापुढे लावल्या असतील तर त्यांनी त्या काढून टाकाव्यात, असे आवाहन परिषदेने पत्राद्वारे केले आहे.