शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:07 PM

कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या धास्तीने कुटुंबातील लोकही एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत

मुंबई - संपूर्ण जगात हाहाकार घालत असलेल्या कोरोनाची धास्ती एवढी वाढली आहे, की कुटुंबातील लोकच आता एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. अशा स्थितीत, सोशल मीडियावर काही असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, जे पाहिले की डोळे टचकन भरून येता. 

कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे. अशा भावनिक प्रसंगी त्यांचे डोळे भरून येत आहेत. 

सौदी अरेबियातील डॉक्टर -

हा व्हिडिओ सौदी अरेबियातील एका डॉक्टरचा आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात सौदी अरेबियाही सुटलेला नाही. तेथेही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि नर्सेसना याची लागण होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे.

पोटच्या चिमुकल्यांना गळ्याशीही लावता येईना - 

आपण अनेकदा पाहतो, की अनेक घरांत पालक ऑफिसातून आले की छोटी मुले धावत येतात आणि त्यांना बिलगतात. सौदी अरेबियातील एका डॉक्टरचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, एक डॉक्टर रुग्णालयातून सरळ घरी पोहोचतात. घराचे गेट उघडताच त्यांचा मुलगा बाबा-बाबा म्हणत त्यांच्याकडे धावत येथो. मात्र, ते त्याला नो-नो म्हणत थांबवतात आणि मुलगाही थबकून थांबतो. या नंतरचे दृष्य मात्र डोळ्यात पाणी आणणारे आहे, कारण यानंतर त्याच्या वडिलांना अश्रू अनावर होतात आणि ते मुलापासून काही अंतरावर खाली बसून डोक्याला हात लावत ढसाढसा रडू लागता.

ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ केवळ पाच सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ एक सोशल मीडिया यूजर माइक यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर ट्विट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच नकांनी यावर आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईdelhiदिल्ली