शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याची वाट बघू नका, रस्ते दुरुस्ती करा

By admin | Updated: January 31, 2015 05:23 IST

पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़चांगले रस्ते व पायाभूत सुविधा देणे ही पालिका व शासनाची मुख्य घटनात्मक जबाबदारी आहे़ त्यामुळे केवळ पावसाळ्यातच खड्डे अधिक असतात, म्हणून तेव्हाच तत्परतेने काम करायचे हे पूर्णपणे गैर आहे, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़ तसेच यासाठी ठोस धोरण आखून त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश देखील न्यायालयाने पालिकेला दिले आहेत़ खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने या समस्येकडे न्यायालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र न्या़ गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना लिहिले होते़ त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा सुनावणीसाठी सुओमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतला़ यावरील सुनावणीत गेल्यावर्षी न्यायालयाने चांगले रस्ते करण्यासाठी ठोस धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले होते़मात्र, पालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी केवळ पावसाळ्यातच येत असतात़ तेव्हा त्याची दखल घेतली जाते, असे न्यायालयाला सांगितले़ पण खड्ड्यांसाठी पालिकेची वेबसाईट वर्षभर कार्यरत असते, असे शासनाने न्यायालयात स्पष्ट केले़तसेच अ‍ॅड़ रूजू ठक्कर यांनी सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ सध्या मुलुंडहून दक्षिण मुंबईत येण्यासाठी किमान दोन तास लागतात़ कारण या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत़ तेव्हा याबाबत न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड़ ठक्कर यांनी केली़त्यावर न्यायालयाने शासन व पालिकेला चांगलेच फैलावर घेतले व याबाबत ठोस धोरण आखण्याचे निर्देश दिले़ (प्रतिनिधी)