शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची घुसमट होऊ देऊ नका! - नाना पाटेकर

By admin | Updated: October 26, 2015 02:50 IST

शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले

बुलडाणा : शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत देण्यात आली.प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असते. आपल्याच आनंदात असते. मात्र आता मनाच्या भिंती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. लोकांनी लोकांसाठी चालविलेला हा उपक्रम आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षांपासून आहे. आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ‘नाम’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो, असे नाना म्हणाले. अनासपुरे म्हणाले की, शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचे बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. पुढील टप्प्यात ‘नाम’च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरगुती उद्योग मिळवून देण्यासाठीसुद्धा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)