शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना व्याजमाफी नको, कर्जमाफी द्या !

By admin | Updated: May 14, 2016 02:31 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात.

लातूर : राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात. महाराष्ट्राचे हात हलवत परत येतात. केंद्राने नाही दिले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी १०-१५ हजार कोटी देणे सरकारला काय अवघड आहे ? व्याजमाफी नको तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मे महिना आला तरी सरकारच्या उपाययोजना नाहीत. गारपीटीचे पैसे दिले. ३१ मार्चपर्यंत वाटा असे आदेश होते. ते शक्य न झाल्याने पैसे परत गेले. त्याला मुदतवाढ का दिली नाही ? हे पैसे विदर्भाकडे वळवण्यात आले. आता तर सुप्रिम कोर्टाने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासंबंधीच्या वीजबील माफ, शैक्षणिक फी माफ, व्याज माफ अशा साऱ्या सवलती द्याव्यात. लातूरला रेल्वेने पाणी देणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाणी दिल्याचे अभिमानाने सांगितले, पाठोपाठ पाण्याचे बिलही दिले. त्यांच्यात पाणी आहे काय ? टँकरवर फलक लावले. आता पाण्यात कमळ तरी सोडू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)वर्षभरात सरकार जाईल : हे सरकार पुढच्या वर्षभरात जाईल. त्यानंतर पुन्हा ते कधीच निवडून येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सेना आणि भाजपा यांच्यातील नाते फार काळ टिकेल असे वाटत नसल्याचे राणे यांनी सांगितले.