शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका  : उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:51 IST

‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला.

ठळक मुद्देबैलगाडा शर्यत सुरू करण्याचा विश्वास कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविले

खेड/राजगुरूनगर: सध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते. कारण धरणे सुकू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या आजुबाजुलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकार विरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.      राजगुरूनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारक अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाच्या उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.    याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  आमदार निलम गो-हे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे ,माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.     उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे. सरकार शेतक-यांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही.त्यांचा योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविण्यात आले.  भगव्याचे राज्य येणारच असा विश्वास व्यक्त करून बैलगाडा शर्यत सुरू करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत. मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेस त्यांनी तीनही शहीदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज चाळीस वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी  आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.        यावेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वात आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले. मात्र, आपण केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करून त्यास ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणा-या पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे.     यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. आभार जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी मानले.......................

टॅग्स :KhedखेडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDamधरणShiv Senaशिवसेना