शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चालकांकडे गाडीची कागदपत्रे मागू नका

By admin | Updated: March 17, 2017 03:29 IST

वाहनचालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करु नयेत, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत

मुंबई : वाहनचालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करु नयेत, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे वाहतूक पोलिसांवरील अनावश्यक ताण कमी होऊन भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. तथापि, या निर्णयामुळे पोलिसांबाबतची भीती कमी होणार असल्याचाही सूर उमटत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यात वाहनांच्या रांगाही वाढत आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मुख्य काम वाहतूक विभागाकडे आहे. मुंबईचे रस्ते, जकात नाका, द्रुतगती मार्ग अशा विविध ठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला अडविल्यास सुरुवातीला त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली जाते. अशावेळी लायसन्स, पीयूसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावला जातो. कागदपत्रांअभावी चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. तर अनेकदा यातून सुटण्यासाठी तडजोड करत लाचेचा मार्ग स्वीकारण्यात येतो. त्यामुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोप वाहतूक विभागातील सुनील टोके यांनी करत थेट हायकोर्टात धाव घेतली आणि वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. मुळात वाहतूक पोलिसांवर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि वाहतुकीत शिस्त आणणे ही मुख्य जबाबदारी आहे. तर कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही यासाठी आरटीओंचे विशेष पथक तैनात आहे. त्यामुळे विनाकारण कागदपत्र तपासणीत अडकल्यामुळे भ्रष्टाचाराबरोबर वादही वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. १ जानेवारी २०१७ पासून मुंबई वाहतूक विभागातर्फे ई-चालानद्वारे कारवाई सुरु करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि त्याचप्रमाणे कॅशलेस व्यवहार होणे अपेक्षित असताना वाहतूक विभागातील अधिकारी आणि अंमलदारांकडून पारदर्शकपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची खंत वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे.वाहतूक पोलीस आरटीओची कागदपत्रे मागत असल्याने वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात नाहक वाद निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचेही भारंबे यांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या लायसन्स, पीयूसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कुठल्याच कागदपत्रांची मागणी करु नये, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. जोपर्यंत नवे आदेश जारी होत नाहीत, तोपर्यंत या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.या आदेशामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे मत आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच वाहतूक पोलिसांवरील ताणही कमी होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)