शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

लालपरी बंद करण्याचा रावतेंचा डाव; मनसेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 8:06 PM

परिवहन मंत्र्यांची मनमानी हाणून पाडण्याचा मनसेचा इशारा

सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र हा डाव मनसे हाणून पाडेल. मंत्री रावते यांना लालपरी बंद करून शिवशाही बस सुरू करण्याचा विचार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष हरी माळी यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एसटी भ्रष्टाचाराचे आगार बनल्याचा आरोपही केला. यावेळी सुनील जाधव, बनी नाडकर्णी, राजू कासकर, सुहास मेढे उपस्थित होते.माळी म्हणाले, मंत्री दिवाकर रावते हे फक्त शिवसेनेच्या कामगार संघटनेचे ऐकतात. त्यांना फक्त शिवसेनेची संघटना वाढवायची आहे. त्यामुळे ते इतर संघटनांचे ऐकत नाहीत. राज्यातील सर्व आगारप्रमुखांना तसे आदेश त्यांनी दिले आहेत, असा आरोप करत एसटीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. जुन्या एसटीचे लाल डबे बदलून, आहे ते पार्ट वापरून रस्त्यावर आणण्याचा घाट घातला जात आहे, असा दावा त्यांनी केला. 'रायगडमध्ये अशा शंभर एसटी बसेस रस्त्यावर आणण्यात आल्या आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शिवशाही बसचे सर्वात जास्त अपघात झाले. या विरोधात मनसेने आवाज उठवला. मात्र परिवहन मंत्री सतत संघटना आवाज उठवतात म्हणून एसटीच्या कार्यालयात यायचे बंद झाले. मंत्रालयात ते कुणाला भेटत नाहीत. एसटीच्या जागा त्यांना विकायच्या आहेत. यातून रावतेंना  खाजगीकरण करायचे हे सिध्द होते. मनसे कामगार सेना एसटीचे खाजगीकरण हाणून पाडणार असल्याचा इशारा यावेळी माळी यांनी दिला.

मनसे रस्त्यावर उतरणारमंत्री रावते यांची वाटचाल लालपरी बंद करण्याच्या दिशेने सुरू आहे. अनेक जिल्ह्यात लालपरीचा रंग बदलण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांची भेट घेतली, तर ते अशीच उत्तरे देतात. तसेच एसटीच्या आगाराचे काम गरज नसताना काढले जात आहे, असा आरोप करत मनसे या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी माळी यांनी दिला. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळDiwakar Raoteदिवाकर रावते